जळगाव प्रतिनिधी- जळगाव जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन तर्फे आयोजीत राज्य मानांकन टेनिस स्पर्धेला आज जळगाव येथील पोलिस मुख्यालयाच्या टेनिस कोर्ट वर सुरवात झाली. महाराष्ट्र लॉन टेनिस असोसिएशन मार्फत या टेनिस राज्य मानांकन स्पर्धा जळगाव जिल्हा लॉन टेनिस असोसिएशनला प्रथमच मिळाला आहे.
या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून १० वर्षा आतील टेनिसपटूंनी आपला सहभाग नोंदविला आहे. पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी या स्पर्धेचे क्रीडांगण पूजन व श्रीफळ वाढवून केले. सर्व खेळाडूंना त्यांनी या स्पर्धेसाठी शुभेच्छा देताना सर्वोकृष्ट तसेच खिलाडूवृत्ती जोपासून खेळण्याचा प्रेमळ सल्ला दिला. जळगाव टेनिसचे अध्यक्ष रमेशदादा जैन यांनी डॉ महेश्वर रेड्डी यांचे स्वागत केले तसेच स्पर्धेविषयी माहिती दिली. उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन आफ्रिन खान हिने केले. या प्रसंगी महाराष्ट लॉन टेनिस असोशीएनशचे श्री प्रवीण तर जळगाव असोसिएशनचे प्रवीण पटेल, राजेंद्र सोनवणे, प्रतीक हरिमकर प्रशिक्षक कृपाल सिंह ठाकूर, अरविंद देशपांडे व टेनिस प्रेमी उपस्थित होते.
पहिल्या दिवशी झालेल्या सामन्याचा वृत्तांत;
10 वर्षे आतील मुली
आराध्या नाथांनी (जळगाव) विजयी विरूद्ध अवनी जाधव (अमरावती) 6-1, भार्गवी भोसले(सांगली) विजयी विरूद्ध जिविका ठाकूर (जळगाव) 6-1, निधी पाटील (धुळे) विजयी वी हरदिनी त्रिभुवन (संभाजी नगर) 6-2, भार्गवी भोसले(सांगली) विजयी वी जिविका ठाकूर (जळगाव)
उद्या मुलीचा अंतिम सामना
भार्गवी भोसले(सांगली) विरूद्ध निधी पाटील (धुळे)
10 वर्षे आतील मुले
आरूष देशपांडे (पुणे) विजयी सिद्धेश कोटचा (संभाजी नगर) 6-0, दिवेशामुदय विजयी विरुद्ध नैतिक मुनोड जळगाव 6-0, रितिक नवले पुणे विजयी विरुद्ध क्रितिक खंडेलवाल धुळे6-1, डोहाळ कसले संभाजी नगर विजयविरुद्ध अवि सूद जळगाव 6-0, युवान जैन जळगाव विजय विरुद्ध असत मंसूरी 6-0, विराज कुलकर्णी पुणे विजयविरुद्ध रियांश पाटील कोल्हापूर6-3, आदित्य उपाध्ये पुणे विजयविरुद्ध आयान घुमरे संभाजी नगर 6-4
उद्याचे उपांत्य सामन
आरुष देशपांडे पुणे विरुद्ध रोहाड कसले संभाजीनगर, युवान जैन जळगाव विरुद्ध आदित्य उपाध्ये पुणे
आजच्या सामन्यात पंच म्हणून देव ठाकूर, सनथ नाथानी, जिनेश मंधान, तीर्थ पटेल यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वितेसाठी तन्वीर पठाण, सुभाष घोडेस्वार, महादेव पळसकर यांनी तसेच पोलिस मुख्यालयाचे पोलिस सहकाऱ्यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.