
लेवा पाटीदार प्रीमियर लीग स्पर्धेस केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांची भेट
जळगाव प्रतिनिधी
जळगाव शहरातील शिरसोली रोडवरील रोयल टर्फ येथे लेवा पाटीदार सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशन तर्फे आयोजित लेवा पाटीदार प्रीमियर लीग, कवयित्री बहिणाबाई महिला बॉक्स क्रिकेट लीग (पर्व-१) आणि भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल पुरुष बॉक्स क्रिकेट लीग (पर्व-१) या स्पर्धांना केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी २९ मार्च रोजी भेट दिली.
सदर स्पर्धांचे आयोजन २८ ते ३० मार्च दरम्यान करण्यात आले असून, केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे या या स्पर्धांच्या ब्रँड अँबेसिडर आहेत. त्यांनी खेळाडूंचे मनोबल वाढवत त्यांच्याशी संवाद साधला.
यावेळी भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा डॉ. केतकी पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.