Social
जिल्हास्तरीय लोकशाही दिनात 122 अर्ज प्राप्त

जिल्हास्तरीय लोकशाही दिनात 122 अर्ज प्राप्त
जळगाव;- दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन दिनांक 7 एप्रिल रोजी सकाळी 11.00 वाजता अल्पबचत सभागृह जळगाव येथे आयोजित करण्यात आला होता.
उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या लोकशाही दिनात एकूण 122 अर्ज प्राप्त झाले. या अर्जाचे निराकरण करण्यासाठी सबंधीत विभागाचे अधिकारी उमा ढेकळे, तहसिलदार ( संजय गांधी), नायब तहसिलदार राहुल सोनवणे, (करमणूक शाखा), तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.