माविआचे ४२ जागांबाबत उमेदवार निश्चित? वाचा जळगाव, रावेरात कोण?
महा पोलीस न्यूज | २ मार्च २०२४ | आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मविआचा जागा वाटप फॉर्म्युला दोन दिवसांपूर्वीच ठरविण्यात आला होता. दरम्यान, टिव्ही ९ ने दिलेल्या एका वृत्तानुसार माविआचे ४२ जागांबाबत उमेदवार निश्चित झाले असून जळगाव लोकसभा मतदार संघातून हर्षल माने तर रावेर लोकसभा मतदार संघातून एकनाथराव खडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे वृत्त त्यांनी दिले आहे.
देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून आचारसंहिता १० ते १५ मार्च दरम्यान जाहीर होण्याची शक्यता आहे. उमेदवार निश्चितीबाबत दोन दिवसापासून भाजपच्या मॅरेथॉन बैठक सुरू आहे. भाजपची यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, माविआची पहिली यादी निश्चित झाली असल्याचे वृत्त एका वाहिनीने दिले आहे. वृत्तानुसार माविआचे ४२ जागांबाबत उमेदवार निश्चित झाले असून जळगाव लोकसभा मतदार संघातून हर्षल माने तर रावेर लोकसभा मतदार संघातून एकनाथराव खडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे त्यात म्हटले आहे.