Other

मेहुणबारे पोलीस स्टेशनची कामगिरी : ट्रॅक्टरच्या सुटे भागांची चोरी उघड, दोघे आरोपी अटकेत

मेहुणबारे पोलीस स्टेशनची कामगिरी : ट्रॅक्टरच्या सुटे भागांची चोरी उघड, दोघे आरोपी अटकेत

चाळीसगाव (प्रतिनिधी) – मेहुणबारे पोलीस ठाण्याच्या कार्यतत्परतेमुळे ट्रॅक्टरच्या सुटे भागांची झालेली चोरी काही दिवसांतच उघडकीस आली असून, चोरी गेलेला ५० हजार रुपये किंमतीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे.

दिनांक ८ जून २०२५ रोजी प्रितम पुरुषोत्तम बागुल (वय २६, रा. चिंचगव्हाण, ता. चाळीसगाव) यांनी मेहुणबारे पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यांनी त्यांच्या शेडमध्ये ठेवलेले सोनालिका कंपनीचे ट्रॅक्टर (क्र. एमएच-१९ ईए-३२३४) मधील ट्रॉली जोडण्यासाठीचे डाबर, पिना, तसेच रोटर नांगरासाठी लागणारे आडवे व उभे हात असे एकूण ५०,००० रुपयांचे सुटे भाग अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची माहिती दिली होती. या प्रकरणी गुन्हा क्रमांक १३७/२५ अन्वये कलम ३०३ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय वेरुळे यांच्या मार्गदर्शनानुसार तपासाची दिशा ठरवण्यात आली. प्रभारी अधिकारी प्रवीण दातरे (सहाय्यक पोलीस निरीक्षक) यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक तयार करण्यात आले. पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे आणि तांत्रिक विश्लेषणाच्या साहाय्याने संशयित आरोपी प्रवीण जालिंदर पाटील (वय २८) आणि दिलीप श्रीराम निकम (वय २२, दोघे रा. चिंचगव्हाण, ता. चाळीसगाव) यांना ताब्यात घेतले.

न्यायालयीन कोठडीत चौकशी दरम्यान दोघा आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांनी चोरून नेलेले ट्रॅक्टरचे सुटे भाग पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त केला असून अधिक तपास सुरू आहे.

या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड, पोहेकॉ. मोहन सोनवणे, किशोर पाटील, शांताराम पवार व पो.कॉ. विनोद बेलदार यांनी सक्रिय सहभाग घेतला.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button