Other

मालेगावातील मोटर सायकल चोरी करणारे चोरटे स्थानिक गुन्हे शाखेचे जाळयात

मालेगावातील मोटर सायकल चोरी करणारे चोरटे स्थानिक गुन्हे शाखेचे जाळयात

चोरीच्या ११ मोटर सायकल हस्तगत

नाशिक ग्रामीण जिल्हयातील मोटर सायकल चोरीचे वाढत्या गुन्हयांना प्रतिबंध होण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील यांनी नाउघड गुन्हयांचा आढावा घेवून कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याअभूषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने मोटर सायकल चोरीचे गुन्हयांतील आरोपीचे सध्याचे वास्तव्याबाबत तसेब चोरीच्या मोटर सायकल कोठे विकी केल्या जातात याबाबत सविस्तर माहिती घेवून मालेगाव शहरातील मोटर सायकल चोरांना लाब्यात घेवून कारवाई केली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मगर यांचे पथकातील अधिकारी व अंमलदार हे नाउपड मोटर सायकल चोरीचे गुन्हयांचा समांतर तपास करीत असतांना, गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मालेगाव शहर व नाशिक जिल्हयातील खेडोपाडयांमधून चोरी केलेल्या मोटर सायकल कमी किंमतीचे भावात विकी करण्यासाठी काही संशयीत मालेगाव तालुक्यातील सोयगाव येथे येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती. स्थावरून पोलीस पथकाने सोयगाव, ता. मालेगाव परिसरात सापळा रचुम खालील संशयीतांना ताब्यात घेतले आहे.

१) संदीप सोमनाथ वाघ, वय २१, रा. नव-वसाहत, सोयगाव, ता. मालेगाव

२) पतन निवृत्ती कदम, वय २०, रा. मु, मळगाव, पो. गिरणा डॅम, ता. नांदगाव, हल्ली विसे मळा, कॉलेजरोड, नाशिक ३) विधीसंघर्षितग्रस्त, रा. लाहगाय, मालुंजे, ता. श्रीरामपुर, जि. अहिल्यानगर

४) नदिम अहमद नासीर अहमद, रा. करीम नगर, मालेगाव (फरार)

ताब्यात घेतलेले वरील संशयीतांचे कामात मिळून आलेल्या होण्डा युनिकॉर्न मोटर सायकलचे कागदपत्रांबाबत विचारपुस केली असता, त्यांनी उड़या-उडवीची उत्तरे दिली. त्यांना विश्वासात घेवून सखोल चौकशी केली असता त्यांनी सदस्वी मोटर सायकल पवारवाडी, मालेगाव परिसरातुन चोरी केल्याची कबुली दिली आहे.

यातील ताब्यात घेतलेले वरील आरोपी क. १ ते २ यांचेकडे मोटर सायकल चोरीचे गुन्हयांचे समांतर तपासात अधिक चौकशी केली असता त्यांनी मालेगाव, सटाणा, कळवण, तसेच नाशिक शहर व जिल्हयातील खेडोपाडयांमधुन एकुण ११ मोटर सायकली चोरी केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपीनी कबुली दिल्यावरून पवारवाडी पोलीस ठाणेकडील गुरनं १५८/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०३(२) प्रमाणे दाखल असलेला गुन्ह्य उघडकीस आलेला आहे.

यातील ताब्यात घेतलेले आरोपीचे कब्जातुन चोरीच्या ०३ हिरो स्प्लेंडर, ०२ होण्डा यूनिकॉर्न, ०१ हिरो एचएफ डिलक्स, ०१ यामाहा आरएक्स १००, ०१ होण्डा शाईन, ०१ सुझुकी अॅक्सेस, ०१ पेंशन प्रो., ०१ हिरो अयुएट अशा एकूण पोरीच्या ११ मोटर सायकल कि. स. ०४ लाख ६० हजार चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर आरोपींना पवारवाडी पोलीस स्टेशनकडील वरील गुन्हयात अटक करण्यात आली असून त्यांचेकडून मोटर सायकल चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

मोटर सायकल बोरीचे गुन्हयांमधील अभिलेखावरील आरोपीतांचे सध्याचे ठाव ठिकाणांबाबत माहिती काढण्यास पोलीस पथकांना सुचना देण्यात आलेल्या असून यापुढेही वरीलप्रमाणे सत्वर कारवाई करण्यात येणार आहे.

नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. आदित्य मिस्ठोलकर, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री. तेगबीर सिंह संधू यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मगर, पोउनि दत्ता कांभीरे, पोउनि सुदर्शन बोडके, सपोउनि नवनाथ सानप, पोलीस अंमलदार सुभाष चोपडा, दिपक गुंजाळ, विनोद टिळे, विशाल गोसावी, नवनाथ शिरोळे, किरण बैरागी, कैलास मानकर, दत्तात्रय माळी, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम यांचे पथकाने चोरीच्या ११ मोटर सायकल हस्तगत करून कामगिरी केली आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button