Politics

जिल्ह्यात सर्वाधिक मते मिळवणाऱ्या आमदारांमध्ये मंगेश चव्हाण पहिले तर राज्यात 24 व्या क्रमांकावर

चाळीसगावः  राज्यातील सर्वच मतदार संघातील मतदानाची आकडेवारी समोर आली आहे.त्यात चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात आजवरच्या इतिहासात सर्वाधिक मताधिक्य घेऊन विजयी झालेल्या मंगेश चव्हाण यांचा नावावर नवीन विक्रम झाले आहेत.

जिल्ह्यातील सर्वात तरुण आ. मंगेश चव्हाण असून . जिल्ह्यातील सर्व उमेदवारांपैकी सर्वाधिक मते त्यांनी घेतली आहेत. १ लाख ५७ हजार १०१ इतके सर्वाधिक मते घेणारे ते जिल्ह्यात नंबर १ ठरले आहेत. तसेच राज्यात सर्वाधिक मते घेणाऱ्या २८८ पैकी २५ आमदारांमध्ये देखील त्यांनी 24 वे स्थान पटकावले आहे. राज्यात दीड लाखांहून अधिक मताधिक्य प्राप्त करणारे  ३२ आमदार आहेत. त्यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील सात जणांचा समावेश आहे,

त्यामध्ये धुळे रघुवेंद्र पाटील १ लाख ७० हजार ३९८, बागलाणचे दिलीप बोरसे १ लाख ५९ हजार ६८१ मालेगावचे दादाजी भुसे १ लाख ५८ हजार २८४, चाळीसगावचे मंगेश चव्हाण १ लाख ५७ हजार १०१, नाशिकचे राहुल ढिकले १ लाख ५६ हजार ८४६ नंदुरबारचे विजयकुमार गावित १ लाख ५५ हजार १९० जळगाव सुरेश भोळे-१ लाख ५१ हजार ५२६, शिंदखेडा जयकुमार रावल-१ लाख५१ हजार ४९२ यांचा समावेश आहे.

राज्यात सर्वाधिक मते चिंचवड येथील शंकर जगताप-२ लाख ३५ हजार ३२३ यांना मिळाली आहेत. चाळीसगाव मतदारसंघात गेल्या अडीच वर्षातील भरीव विकास कामांमुळे जनतेने त्यांना भरभरून मतदान केल्याचे या निमित्ताने दिसून आले आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button