Politics
जळगाव शहर वुलन मार्केट असोसिएशनचा आ. राजूमामा भोळे यांना पाठिंबा
- जळगाव (प्रतिनिधी) शहरातील शिवतीर्थ मैदानावरील जळगाव शहर वुलन मार्केट असोसिएशनने जाहीर पाठिंबा देऊन मार्केटच्या सर्व सदस्यांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले आहे.
आ.राजूमामा भोळे यांनी शुक्रवारी दि. १५ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी वूलन मार्केट येथे भेट दिली. असोसिएशनतर्फे त्यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन भावपूर्ण सन्मान करण्यात आला. त्यावेळी पदाधिकाऱ्यांनी आ. राजूमामा भोळे यांच्याशी संवाद साधला. प्रसंगी, जळगाव शहर वूलन मार्केट असोसिएशनतर्फे, आम्ही आ. राजूमामा भोळे यांना जाहीर पाठिंबा देत आहोत. सर्व सदस्यांनी निवडणुकीत आ. भोळे यांच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन पदाधिकाऱ्यांनी केले. प्रसंगी भाजप, शिवसेना महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.