राज्यात सकाळी 9.30 वाजेपर्यंत 6.61 टक्के मतदान
मुंबई (वृत्तसंस्था);- राज्यात सकाळी 9.30 वाजेपर्यंत 6.61 टक्के मतदान झालं आहे. मतदानाची टक्केवारी खूपच कमी आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडून मतदान करा अशी विनंती अनेक सेलिब्रिटींनी केलं. दरम्यान, आजच्या मतदासाठी अनेक दिग्गज नेत्यांनी मतदान केले आहे.
सोमवारी प्रचाराच्या तोफा थंडावल्या. तर आज बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. राज्यातील २८८ मतदारसंघांमध्ये मतदान होत असून यावेळच्या मतदानाला किती प्रतिसाद मिळतो हे पाहाणं महत्त्वाचं आहे.
दरम्यान ,राज्यात एकूण 4 हजार 136 उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएम मशिनमध्ये बंद होणार आहे. तर शनिवारी 23 नोव्हेंबर रोजी मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, पक्ष फुटीनंतर राज्यात पहिल्यांदाच विधानसभा निवडणूका पार पडत आहेत. यासाठी गेल्या महिनाभरापासून राज्यात प्रचाराचा धुरळा उडाला होता. यातच आता महायुती आणि महाविकास आघाडीनेही कंबर कसल्याचं दिसून आले.