Crime

ब्रेकिंग : ममुराबाद रस्त्यावरील फार्म हाऊसवर मोठी रेड!

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरापासून जवळच असलेल्या ममुराबाद गावानजीकच्या एका फार्म हाऊसवर रविवारी दुपारच्या सुमारास जळगाव पोलिसांनी छापा टाकला. या फार्म हाऊसमध्ये एमसीएक्स नावाने ट्रेडिंग कॉल सेंटर सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, ममुराबाद रस्त्यावर जळगाव जिल्ह्यातील एका बड्या व्यक्तीचे फार्म हाऊस असून त्या ठिकाणी एमसीएक्स ट्रेडिंग नावाने बनावट कॉल सेंटर सुरू असल्याची माहिती जळगाव पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलिसांनी दुपारी १ वाजेच्या सुमारास पथकासह त्या ठिकाणी धाव घेत छापा टाकला.

फार्म हाऊसमधून काही कॉम्प्युटर आणि मोबाईल हस्तगत करण्यात आले असून अधिक चौकशी सुरू आहे. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे कारवाई करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राहुल गायकवाड, तालुका पोलीस निरीक्षक संजय गायकवाड आदींसह पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. दरम्यान, या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button