एमआयडीसी पोलिसांनी पकडली दुचाकी चोरट्यांची गँग, चार दुचाकी हस्तगत

महा पोलीस न्यूज । १२ ऑगस्ट २०२४ । एमआयडीसी पोलिसात दाखल गुन्ह्यातील दुचाकीचा शोध घेत असताना पथकाने दुचाकी चोरट्यांच्या गँगचा छडा लावला आहे. पथकाने चौघांना अटक केली असून ४ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. पोलिसांनी पाठलाग करून चौघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलीस कोठडीत त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
सुप्रीम कॉलनी येथील अमजद अजीज खाटीक यांच्या मालकिची होंडा शाईन मो सा क्र. एमएच.19.डीके.1501 ही घरासमोरुन दि.१ ऑगस्ट रोजी चोरी गेली होती. याबाबतीत एमआयडीसी पोस्टेला बीएनएस कलम 303 (2) प्रमाणे मो सा चोरीचा गुन्हा दाखल आहे. गुन्हयाचे तपासकामी गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार हे सुप्रीम कॉलनी परीसरात दि.९ रोजी गस्त करीत असतांना 4 संशयीत इसम हे दोन पल्सर मोटार सायकलींवर फिरतांना दिसुन आले होते. पोलीसांना त्यांचा संशय आल्याने त्यांचा पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्यांना दुचाकीबाबत विचारपुस करता एक पल्सर मोटार सायकल ही एरंडोल येथुन आणि दुसरी पल्सर ही रामांनदनगर पोस्टे हद्दीतुन चोरुन आणल्याची त्यांनी कबुली दिली होती.
पोलीस निरीक्षक दत्तात्रय युवराज निकम यांनी गुन्हे शोधपथकास सखोल तपास करणेबाबत सुचना दिल्या होत्या. सखोल चौकशीत त्यांनी राहुल आनंदा पाटील रा.शिवाजी महाराज पुतळ्याजवळ उमाळा, राजेश सुरेश सैंदाणे रा.पठाण बाबा दर्या जवळ समतानगर, आकाश पंडीत बि-हाडे उमाळा, प्रथमेश उर्फ बाळु गंगाधर कोलते रा.उमाळा अशी नावे सांगितली. सखोल चौकशी करता त्यांनी आणखी दोन मोटार सायकली चोरी केल्याची कबुली दिली. त्यावरुन त्यांना अटक करुन त्यांची ३ दिवस पोलीस कस्टडी रीमांड घेण्यात आली असता चारही दुचाकी जप्त करण्यात आलेल्या आहेत.
संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या पथकातील हवालदार दत्तात्रय बडगुजर, गणेश शिरसाळे, किशोर पाटील, योगेश बारी, महेंद्र पाटील, नाना तायडे, किरण पाटील, ललीत नारखेडे, नितीन ठाकुर, शादाब सैय्यद, इस्त्राइल खाटीक, सुभाष साबळे, मंदार महाजन यांच्या पथकाने केली आहे.