जळगाव एमआयडीसीतील चोरी प्रकरणी आरोपी ४ तासांत गजाआड

जळगाव एमआयडीसीतील चोरी प्रकरणी आरोपी ४ तासांत गजाआड
जळगाव प्रतिनिधी जळगावातील एमआयडीसी परिसरातील ‘व्ही सेक्टर’ मधील बंद असलेल्या V-15 कंपनीतून दिनांक १३ जुलै २०२५ रोजी १८,०००/- रुपयांचे तांब्याच्या तारांचे १३ रिल आणि ५,६००/- रुपयांचे पॉलीकेब ब्रँडचे इलेक्ट्रिक वायरचे ७ बंडल, तसेच V-130 गौरी पॉलीमर्स कंपनीतून २५,०००/- रुपयांचे चटई मशीनचे स्पेअर पार्ट्स, असा एकूण ४८,६००/- रुपयांचा माल चोरीला गेल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा (क्र. ५१०/२०२५, BNS कलम ३३४(१), ३०५(अ)) दाखल झाला.
पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या आदेशानुसार, गुन्हे शोध पथकाने तपासाला सुरुवात केली. पो.उ.नि. राहुल तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.का. गणेश शिरसाळे, रामकृष्ण पाटील, पो.कॉ. राहुल रगडे, विशाल कोळी, गणेश ठाकरे, राहुल घेटे आणि नितीन ठाकूर यांच्या विशेष पथकाने ‘नेत्रम योजना’ अंतर्गत बसविलेल्या सीसीटीव्ही फुटेजचा वापर करून तपास केला.
फुटेजमध्ये दोन अज्ञात महिला चोरीचा माल गोणीत भरताना आणि मालवाहू रिक्षात टाकताना दिसल्या. रिक्षाच्या क्रमांकावरून आरोपी इमरान खान सलीम खान भीस्ती ऊर्फ रेपट्या (रा. शाहूनगर, जळगाव) याला ४ तासांत ताब्यात घेण्यात आले.जप्त मुद्देमाल:तांब्याच्या तारांचे १३ रिल (१८,०००/- रुपये)पॉलीकेब वायरचे ७ बंडल (५,६००/- रुपये)चटई मशीनचे स्पेअर पार्ट्स (२५,०००/- रुपये)मालवाहू रिक्षाही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित आणि पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी झाली. ‘नेत्रम’ योजनेतील पो.कॉ. पंकज खडसे आणि मुबारक देशमुख यांचे मोलाचे सहकार्य लाभले. पुढील तपास पो.हे.का. रामकृष्ण पाटील आणि पो.कॉ. नरेंद्र मोरे करीत आहेत.