एमआयडीसी पोलिसांनी दोन दुचाकी चोरीचे गुन्हे केले उघड ; दोन भामट्यांना अटक

एमआयडीसी पोलिसांनी दोन दुचाकी चोरीचे गुन्हे केले उघड ; दोन भामट्यांना अटक
जळगाव ( प्रतिनिधी ) – दुचाकी चोरीच्या घटना अलीकडे वाढल्या असून या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी दोन चोरट्यांना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहे.
पहिल्या घटनेमध्ये दुचाकी चोरीची फिर्यादी सिद्धार्थ दीपक शर्मा (वय २३, रा. बालाजी मंदिर जवळ, जळगाव) यांनी दिली होती . त्यांची दुचाकी २९ जानेवारी २०२५ रोजी मध्यरात्री १२:३० च्या सुमारास कोणीतरी चोरून नेली होती. या गुन्ह्याचा तपास करीत असतांना पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून १७ फेब्रुवारी २०२५ रोजी पहाटे १ वाजता आकाश सुरेश शिंदे (वय १९, रा. साईनगर, कुंसुबा, जळगाव) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून दुचाकी हस्तगत करण्यात आली .
दुसर्या घटनेमध्ये फिर्यादी सायरस महेश बोंडे (वय २८, ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार १४ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ९:३० ते ११:३० वाजण्याच्या दरम्यान शिरसोली रोडवरील रॉयल टर्फ परिसरातून ३५ हजार रुपये किमतीची होंडा ड्रीम युगा मोटारसायकल चोरी गेल्याची घटना घडली होती . त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबाबत
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार १९ फेब्रुवारी २०२५ रोजी संशयित सुरज मुनेंद्र द्विवेदी (वय २२, रा. सेक्टर डी, साईमत ऑफिस जवळ, जळगाव) याला अटक करून त्याच्याकडून चोरीस गेलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.
हि कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित आणि पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत झनके, सफौ दत्तात्रय बडगुजर, पोहेकॉ गणेश शिरसाळे, पोना विकास सातदिवे, किशोर पाटील, प्रदीप चौधरी, योगेश बारी, पोकॉ सिद्धेश्वर डापकर, रतन गीत, छगन तायडे, किरण पाटील, ललित नारखेडे, शशिकांत मराठे, नितीन ठाकुर, राहुल घेटे, योगेश घुगे, विशाल कोळी यांनी केली.