Crime
अमळनेरमध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण, गुन्हा दाखल

महा पोलीस न्यूज । पंकज शेटे । अमळनेर शहरातील ताडेपुरा परिसरातून एक १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची घटना २८ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, अज्ञात व्यक्तींविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ताडेपुरा येथील जय मातादी नगरात राहणारी ही मुलगी सायंकाळी ‘खेळायला जाते’ असे सांगून घरातून बाहेर पडली होती. मात्र, रात्री उशिरापर्यंत ती घरी परतली नाही. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला, परंतु ती आढळून आली नाही. त्यामुळे मुलीला कोणीतरी पळवून नेल्याचा संशय बळावला आहे.
अमळनेर पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून, हेडकॉन्स्टेबल गणेश पाटील हे पुढील तपास करत आहेत.