जळगावकरांच्या प्रेमामुळे आमदार राजूमामा भोळे यांच्या ‘हॅट्रिक’वर शिक्कामोर्तब !
रखडलेली प्रलंबित कामे पूर्ण करण्याचा आमदार भोळे यांचा निर्धार !
जळगाव;- नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जळगाव शहर मतदार संघातून सुज्ञ जळगावकरांनी आमदार राजू मामा भोळे यांच्या अजातशत्रू व्यक्तिमत्त्वामुळे तिसऱ्यांदा 87 हजाराहून अधिक मताधिक्याने निवडून देत त्यांना विजयश्री मिळवून दिली. महायुतीच्या विविध घटक पक्ष आणि संघटनांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अहोरात्र झटून आमदार राजूमामा भोळे यांना निवडून आणण्यासाठी परिश्रम घेतले.
तसेच गेल्या दहा वर्षांच्या आपल्या कार्यकाळात आमदार राजुमामा भोळे यांनी केलेली विकास कामे डोळ्यासमोर ठेवून जनतेकडे जाऊन मते मागितली. मी पन्नास टक्के कामे पूर्ण केले असून 25% कामांचे भूमिपूजन झाले आहे उर्वरित 25 टक्के कामे आगामी काळात करून आणखी मोठा निधी जळगाव शहराच्या विकासाकरिता आणू असा विश्वास आमदार भोळे यांनी बोलून दाखविला.
संयमशील धैर्यशील आणि शांत स्वभावाचे आमदार राजू मामा भोळे यांचे व्यक्तिमत्व जळगावकरांना आवडल्याने सुज्ञ जळगावकरांनी माजी मंत्री सुरेश दादा जैन यांच्यानंतर कुणावर प्रेम केले असेल तर ते फक्त आमदार राजू मामा भोळे यांच्यावर केल्याचे शिक्कामोर्तब जळगावकरांनी तिसऱ्यांदा करून दाखवले आहे. हा विश्वासच सार्थ करून दाखवण्याचा निर्धार आमदार राजू मामा भोळे यांनी केला आहे.
जळगाव शहराचा सर्वांगीण विकास हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून आगामी काळात जळगाव शहराला एका नव्या उंचीवर नेऊन या शहराची राज्यात एक विकसित शहर म्हणून ओळख निर्माण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपला राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कुणाच्याही मदतीला अर्ध्या रात्री धावून जाणारे आमदार म्हणून राजू मामा भोळे यांची खास ओळख आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचार काळात आमदार भोळे यांच्या प्रचारार्थ कुठलाही बडा नेता अथवा मोठी सभा जळगाव शहरात झाली नाही. त्यामुळे जळगावकर जनतेनेही विकास पुरुष म्हणून आमदार राजू मामा भोळे यांना डोळ्यासमोर ठेवून त्यांना 87 हजाराहून अधिक मताधिक्क्याने निवडून दिले.
आमदार भोळे यांनी गेल्या दहा वर्षात मतदार संघामध्ये खूप कामे केली असून लाडकी बहीण योजनेपासून विविध योजनांसाठी त्यांनी स्वतःच्या कार्यालयातून मनुष्यबळ उपलब्ध करून ही जनतेची कामे मार्गी लावली आहेत. प्रचारात विरोधक कांवर कुठलीही टीका न करता आपल्या सकारात्मक दृष्टिकोनातून त्यांनी प्रचार केला. मग ते जळगाव शहरातील एमआयडीसी भागात मोठे उद्योग आणण्याचा विषय असो की रस्त्यांची कामे ,उड्डाणपुले, विविध मूलभूत सुविधा पुरविण्यासंदर्भात कटिबद्ध असल्याचे आशीर्वाद त्यांनी मतदारांकडे मागितल्याने त्यांना पुन्हा विधानसभेवर निवडून दिल्याने आमदार भोळे यांनी त्यांच्यावर जळगावकरांनी दाखविलेला विश्वास सार्थ करून दाखविला आहे.