
अखेर सुकळी येथील ग्रामसेवकाची उचलबांगडी;
खामखेडा ग्रामसेवकाकडे अतिरीक्त पदभार!
ग्रामपंचायतीला वारंवार गैरहजर व मनमानी कारभार यामुळे मुक्ताईनगर तालुक्यातील मौजे सुकळी येथील ग्रामसेवकाच्या उपद्रवाला कंटाळुन येथील उपसरपंचासह अन्य चौघा सदस्यांनी गटविकास अधिकारी मुक्ताईनगर यांचेकडे दि 4 फेब्रुवारी रोजी लेखी स्वरुपात तक्रार दाखल केली होती.
दरम्यान ग्रामसेवक मांगोराव साळुंखे हे जामनेर येथे स्थायिक असुन तेथुन ये-जा करीत असत तसेच अनेकदा ग्रामपंचायतीला हजर न राहता मुक्ताईनगर येथे थांबुन दाखले उतारे किंवा अन्य काही कामांसाठी संबंधित ग्रामस्थांना तालुक्याच्या ठिकाणी बोलावत असत. अनेकदा फोन न उचलणे,कोणताही प्रतिसाद न मिळणं यामुळे ग्रामस्थ कमालीचे त्रस्त झाले होते. उपसरपंच व इतर सदस्य यांना विश्वासात न घेता परस्पर कामे करणे यामुळे सुकळी येथील उपसरपंच अनिल कोळी,सदस्य नंदकुमार नमायते,शारदा कोळी व संगिता भोई यांनी पंचायत समिती मुक्ताईनगर कार्यालयात तक्रार अर्ज दाखल होता. केला.ता..परिणामी सदर अर्जाची खल घेत तब्बल महिनाभरानंतर ग्रामविकास अधिकारी मांगोराव साळुंखे यांची उचलबांगडी करण्यात आली असुन त्याजागी खामखेडा येथील ग्रामसेवक विशाल साळुंखे यांचेकडे अतिरिक्त पदभार देण्यासंदर्भात आदेश गटविकास अधिकारी निशा जाधव यांनी आज पारीत केले.