भाऊसाहेब राऊत विद्यालयात पाठ्यपुस्तके व शालेय गणवेशाचे वितरण

भाऊसाहेब राऊत विद्यालयात पाठ्यपुस्तके व शालेय गणवेशाचे वितरण
जळगाव प्रतिनिधी l येथील भाऊसाहेब राऊत विद्यालयात पाठ्यपुस्तके व शालेय गणवेशाचे वितरण करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष माजी नगरसेवक कैलास सोनवणे तर प्रमुख अतिथी म्हणून साई सेवा परिवाराचे प्रकाश टेकवाणी, साई महिला मंडळाच्या सौ.कल्पना टेकवाणी, विद्यालयाचे मुख्याध्यापक .एल.एस.तायडे, श्री.शशिकांत रायसिंग, सौ. प्रमोदिनी सोनवणे, श्री.अरुणकुमार बाविस्कर यांची उपस्थिती होती.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. स्व.नवल टेकवाणी यांचे स्मरणार्थ दरवर्षी विद्यालयात श्री.प्रकाश टेकवाणी व सौ.कल्पना टेकवाणी यांचेतर्फे गत पाच वर्षापासून शालेय पुस्तकपेढीस क्रमिक अभ्यासक्रम पुस्तक संच व शालेय गणवेश दिले जातात यावर्षीही त्यांचेतर्फे इयत्ता ९ वी च्या अभ्यासक्रमाचे वीस पुस्तक संच तसेच पन्नास विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व खाऊचे वितरण करण्यात आले याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष श्री.आप्पासाहेब कैलास सोनवणे व विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.एल एस.तायडे यांनी त्यांचे आभार व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश जाधव यांनी तर आभारप्रदर्शन तुषार भोई यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विनोद कोळी, प्रकाश मेंढे, रविंद्र कोळी, धनराज सोनवणे, योगराज सोनवणे, संगीता शिरसाटे, अंजू पगारे, वैशाली नारखेडे, विशाल सोनवणे, कैलास सपकाळे, सागर हिवराळे व राजेंद्र सपकाळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.






