Detection

शेतमजुरांनीच मारला डल्ला, मुक्ताईनगर पोलिसांकडून १२ तासात चोरीच्या घटनेचा उलगडा

महा पोलीस न्युज | सुभाष धाडे | मुक्ताईनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या एका बंद घराच्या चोरीचा गुन्हा केवळ १२ तासांत उघडकीस आणत पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून सुमारे ४० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

वैभव विकास पाटील (रा.निमखेडी बु., ता.मुक्ताईनगर) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी चांदीचे देव, मोबाईल फोन, रोख रक्कम व मोटारसायकल असा एकूण ५६,००० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला होता. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक CCTNS NO. 204/2025, भा.दं.वि. कलम ३३१ (४), ३०५ प्रमाणे दिनांक २३ जून २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्याचा तपास पो.हे.कॉ. अशोक जाधव यांच्याकडे सोपविण्यात आला होता.

पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे आणि पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास करत अवघ्या १२ तासांत दोन आरोपींचा छडा लावला आहे.

पथकाने गोपाल उर्फ सुरेशसिंग सिमाभाई सोलंकी व गणेश सिमाभाई सोलंकी (दोघेही रा.चिखल्या, ता.अंजड, जि.बडवाणी, मध्यप्रदेश; सध्या राहीवासी सिनफाटा, हलखेडा, ता. मुक्ताईनगर)यांना ताब्यात घेतले. दोन्ही संशयीत आरोपी गेल्या १० वर्षांपासून स्थानिक शेतकऱ्यांकडे काम करीत होते. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून ३० हजार रुपये किमतीची मोटारसायकल, ५ हजारांचा मोबाईल, आणि ५ हजारांचे चांदीचे देव असा एकूण ४० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कामगिरी पोलीस ठाण्यातील कर्मचारी पो.हे.कॉ. अशोक जाधव, पो.ना. प्रदीप इंगळे, हरीश गवळी, पो.अं. अनिल देवरे, सागर साबे व प्रविण जाधव यांनी यशस्वीपणे पार पाडली.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button