मुस्लिम बांधवांचे रमझान निमित्त मनपा आयुक्तांना साकडे

मुस्लिम बांधवांचे रमझान निमित्त मनपा आयुक्तांना साकडे
जळगाव प्रतिनिधी
रमजाननिमित्त महानगरपालिका आयुक्त यांना मुस्लिम बांधवांतर्फे विविध मागण्यांचे निवेदन देण्यात येऊन कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.
मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा, पवित्र, पावन, महत्वपूर्ण व संपूर्ण महिनाभर चालणारा ( माहे रमझान ) रमझान महिना हा यंदा दि. 02 मार्च 2025 रविवार पासून सुरु होणार असून हा संपूर्ण महिनाभर सर्व मुस्लिम बांधव रोझे धरतात तसेच संपूर्ण दिवसभर इबादत (प्रार्थना )करतात.
हे सण साजरे करतांना मुस्लिम बांधवांना कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून संपूर्ण जळगांव शहरात खास करून मुस्लिम बहुल भागात त्यात खास करून मस्जिदी जवळील गटारींची सफाई (स्वच्छता ) करणे, झाडू मारणे,कचरा उचलण्यासाठी घंटा गाडी नियमित येणे, बंद असलेले पथदिवे दुरुस्त करणे तसेच मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावे.
तसेच नळाच्या पाण्याचे वेळेचे योग्य नियोजन जळगांव शहर महानगर पालिकेच्या माध्यमातून अचूकपणे करण्यात यावे यासाठी आज जळगांव शहरातील मुस्लिम बांधवांनी जळगांव ज. श. म. न. पा. चे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे निवेदन देऊन साकडे घालण्यात आले. या प्रसंगी सुन्नी ईदगाह ट्रस्ट जळगांव व सुन्नी जामा मस्जिद जळगांव चे अध्यक्ष सै. अयाज अली नियाज अली, सय्यद जावेद, शेख अमान, काशिफ टेलर, इलियास नुरी, शेख नझीरुद्दिन, सलमान मेहबूब, अफझल मणियार, फिरोज इकबाल, सय्यद उमर, अता ए मोईन अली, झिशान हुसैन इ. उपस्थित होते. या प्रसंगी आयुक्तांशी नागरिक सुविधांबाबतीत सविस्तर चर्चा करण्यात आली.