Crime

जळगावात पुन्हा मर्डर, तरुणाची भोसकून निर्घृण हत्या!

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरातील हॉटेल कमल पॅराडाइजच्या जवळ एका ३० वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. मयत तरुणाचे नाव आकाश पंडीत भावसार रा.अशोक नगर, जळगाव असे आहे. मयताला जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले असून नातेवाईक आणि मित्रपरिवाराने गर्दी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील खून आणि गोळीबारचे सत्र सुरूच आहे. अयोध्या नगरजवळ असलेल्या अशोक नगरात राहणारा आकाश पंडीत भावसार हा तरुण ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करीत होता. शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास पत्नीच्या नातेवाईक असलेल्या काही तरुणांनी हॉटेल ए वनजवळ गाठले.

धारदार शस्त्राने तरुणांनी त्याच्यावर हल्ला केला. मांडीवर, छातीवर आणि गुप्तांगाला गंभीर जखमा झाल्याने तो रक्तबंबाळ झाला. आकाश यास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा मृत्यू झाला. मयतच्या पश्चात आई, पत्नी, १ मुलगा आणि १ मुलगी असा परिवार आहे.

दरम्यान, जिल्हा रुग्णालयात उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, एलसीबीचे निरीक्षक बबन आव्हाड, शनिपेठ पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले आहेत. ४ संशयीत तरुणांची नावे समोर आली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button