Social
नगरदेवळा रेल्वेस्टेशन येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

नगरदेवळा रेल्वेस्टेशन येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
भडगाव- प्रतिनिधी तालुक्यातील नगरदेवळा रेल्वे स्टेशन येथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.त्यांच्या जीवनपटावर माहिती देण्यात आली. तसेच त्यांनी केलेल्या कार्याला उजाळा देण्यात आला.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष गोकुळ संसारे, भगवान शिरसाट, किरण महाले, नागराज धिवरे, आबा गायकवाड, मायाबाई संसारे, रंजनाबाई संसारे, अहिरे मॅडम, पगारे मॅडम, आदी उपस्थित होते.






