Crime

एमपीडीए कायद्यांर्गत जुन्नीची नागपूर कारागृहात रवानगी

जळगाव- प्रतिनिधी ;- गंभीर स्वरूपाचे ७ गुन्हे दाखल असलेल्या जेनसिंग ऊर्फ लकी जिवनसिंग जुन्नी (वय ३४, रा. राजीव गांधी नगर, जळगाव) याच्यावर एमपीडीए कायद्यांर्गत नागपूर कारागृहात स्थानबद्धतेची करवाई करण्यात आली आहे,

दरोडा, मारामारी, खुनाचा प्रयत्न, खंडणीसाठी मारहाण, शस्त्र अधिनियमाचे उल्लंघन यासारखे अनेक गुन्हे जेनसिंगवर जळगाव आणि इतर पोलिस ठाण्यांत दाखल आहेत. जातीय तणाव वाढवणाऱ्या घटनांमध्येही त्याचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. शिवाय त्याच्यावर सीआरपीसी ११० अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करूनही जेनसिंगच्या वागण्यातकोणताही बदल झाला नसल्याने तो खंडेराव नगर पुल परिसर आणि बुधवार बाजारात सामान्य लोकांना धमकावत होता. तसेच शहर आणि इतर जिल्ह्यांमध्ये चोरी, घरफोडी आणि दरोड्याच्या घटनांत सहभागी होत होता.

पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी जेनसिंगच्या गुन्ह्यांची सविस्तर पार्श्वभूमी तयार करून पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली एमपीडीए अंतर्गत स्थनबध्दतेची ही कारवाई केली.

जेनसिंगला मध्यवर्ती कारागृह, नागपूर येथे स्थानबद्ध करण्यात आले असून या कारवाईत पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, सफौ संजय सपकाळे, पोहेकॉ इरफान मलिक, सुनील दामोदरे, सुशील चौधरी यांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या इतर अधिकाऱ्यांनी याबाबत आपली कामगिरी बजावली आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button