नंदुरबार जिल्ह्याला मिळाले नवे पालकमंत्री; हसन मुश्रीफ यांची नियुक्ती!

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । राज्य शासनाने नंदुरबार जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर अखेर नियुक्ती करत हसन मुश्रीफ यांची निवड केली आहे. सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा शासन निर्णय जाहीर केला आहे.
यापूर्वीच्या आदेशानुसार राज्यातील विविध जिल्ह्यांना पालकमंत्री व सहपालकमंत्री नियुक्त करण्यात आले होते. मंत्री माणिकराव कोकाटे यांचे मंत्रीपद गेल्यानंतर मुख्यमंत्री devendra फडणवीस यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी होती. नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री पद काही काळापासून रिक्त होते. ही बाब लक्षात घेऊन शासनाने नव्या नियुक्तीचा निर्णय घेतला आहे.
शासन निर्णयानुसार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील प्रशासकीय कामकाजाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
हा शासन निर्णय राज्य शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून डिजिटल स्वाक्षरीद्वारे प्रमाणित करण्यात आला आहे.






