
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे सप्तश्रृंगी देवी दर्शन
राज्याच्या समृद्धीसाठी देवीचरणी प्रार्थना
जळगाव (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिनांक ४ एप्रिल रोजी वणी (जि. नाशिक) येथील सप्तश्रृंगी गडावर जाऊन देवीचे दर्शन घेतले.
या दर्शनावेळी पालकमंत्री पाटील यांनी राज्यातील शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध होवो, भरपूर पाऊस पडो आणि जलजीवन मिशनच्या माध्यमातून राज्यातील अधिकाधिक घरांपर्यंत शुद्ध पाणी पोहोचो, अशी मनोकामना देवीचरणी व्यक्त केली.
सप्तश्रृंगी मातेच्या कृपाशीर्वादाने संपूर्ण महाराष्ट्रात सुख, समृद्धी व उत्तम आरोग्य लाभो, अशी भावना त्यांनी यावेळी मांडली.
दर्शन प्रसंगी त्यांच्या सोबत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल भोळे, विलास चौधरी उर्फ किटू नाना, जितू पाटील, प्रशांत झंवर, सुभाष पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.