आयजींच्या पथकाची जिल्ह्यात धाड, जुगाराचा डाव उधळला
महा पोलीस न्यूज | २ एप्रिल २०२४ | नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर यांच्या पथकाने मंगळवारी चोपडा शहरात जुगार अड्ड्यावर धाड टाकली. पथकाने १३ जुगारींना ताब्यात घेतले असून साडेचार लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. विशेष म्हणजे पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर देखील रात्री जळगावात पोहचले.
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर यांनी परिक्षेत्रातील अवैध धंदे यांचे उच्चाटन करण्यासाठी नेमणूक केलेले पथक व स्थानिक चोपडा शहर पोस्टेचे अधिकारी व अंमलदार यांनी मंगळवारी दुपारी ३.३० वाजता चोपडा नगरपरिषदच्या पाठीमागे, हॉटेल कान्हाच्या बाजुला भरत देशमुख यांचे पत्र्यांचे शेडलगत मोकळ्या जागेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला
पथकाने केलेल्या कारवाईत लक्ष्मण गोकुळ बावीस्कर वय. ४० वर्षे रा. पंचशीलनगर, चोपडा ता. चोपडा जि.जळगाव, खुशाल एकनाथ बावीस्कर वय. ४८ वर्षे रा. कोळंबा, चोपडा ता. चोपडा जि. जळगाव, अजय कैलास माळी वय.२२ वर्षे रा. लोहीया नगर, थाळनेर दरवाजा चोपडा ता. चोपडा जि. जळगाव, वाल्मिक जिजाबराव शिंदे वय. ४६ वर्षे रा. वरडी ता. चोपडा जि. जळगाव, अमोल पुखराज जैन वय, ३८ वर्षे रा. पंकजनगर, चोपडा जि. जळगाव, हिरालाल रामदास बावीस्कर वय. ४३ वर्षे रा. कोळंबा, ता. चोपडा जि. जळगाव, सागर किशोर पाटील वय.१९ वर्षे रा. बुधगाव, ता.चोपडा जि. जळगाव, प्रविण ओमकार बावीस्कर वय. ४० वर्षे रा. कोळंबा ता. चोपडा जि.जळगाव, प्रदिप धुडकु महाजन वय. ५३ वर्षे रा. अडावद ता.चोपडा जि.जळगाव, अनिल प्यारेलाल लोहार वय. ४७ वर्षे रा. मराठा गल्ली, आशा टॉकीज जवळ, चोपडा जि.जळगाव, सुधाकर छन्नु सोनवणे वय. ३८ वर्षे रा. गौतमनगर, चोपडा जि. जळगाव, आकाश आझाद कोळी वय.२० वर्षे रा. कुरवेल ता. चोपडा जि. जळगाव, योगेश सुधाकर भोई वय.२२ वर्षे रा. होळनाथे ता.शिरपुर जि.धुळे यांना ताब्यात घेण्यात आले तर इतरांनी पळ काढला.
सर्व संशयीत बेकायदेशीर अवैधरित्या स्वःताच्या फायद्यासाठी ५२ पत्यांच्या कॅटवर पैसे लावुन घेवुन तिरट नावाचा जुगाराचा खेळ खेळतांना व खेळवितांना मिळून आले. कारवाईत ४ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. १२६/२०२४ महा. जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.