गावठी कट्ट्यासह नाशिकच्या तरुणाला चोपड्यात पकडले
महा पोलीस न्यूज | ३ जून २०२४ | चोपडा तालुक्यातील मोरचिडा गावचे हद्दीत उमर्टी, अंमलवाडी ते मोरचिडा रस्त्यावर एक तरुण गावठी कट्टा घेऊन उभा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. चोपडा ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळल्या. महेश बाळकृष्ण चव्हाण वय ३१ वर्षे असे अटकेतील तरुणाचे नाव असून त्याचकडे एक गावठी कट्टा आणि २ काडतुस मिळून आले आहे.
चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना गुप्त बातमीव्दारा मार्फत बातमी मिळाली की, दि.१ जून रोजी रात्री ८.४५ वाजेच्या सुमारास मोरचिडा गावचे हद्दीत उमर्टी, अंमलवाडी ते मोरचिडा रोडवर इसम महेश बाळकृष्ण चव्हाण वय ३१ वर्षे मुळ रा.नगर मनमाड रोड, दत्तनगर मु/पो शिडी तालुका राहता जि. अहमदनगर हल्ली रा. प्लॉट नंबर ४, श्री केशववाडी अपार्टमेंट, जनार्दन नगर, जेलरोड, नाशिक हा त्याचे ताब्यात १ गावठी अग्नीशस्र कट्टा (पिस्टल) आणि २ जिवंत काडतुस हे आपले कब्जात बाळगुन घेवुन जात आहे असे समजले होते.
खात्रीशिर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर व सोबत पोलीस शिपाई दिपक शिंदे, रावसाहेब पाटील असे खाजगी वाहनाने रवाना होवुन त्यास सापळा रचून मोरचिडा गावी ताब्यात एक गावठी बनावटीचा कटटा (पिस्टल), पिवळया धातुचे २ काडतुस (राउंड) मिळून आले. तसेच त्याचकडून दुचाकी क्रमांक एमएच.१५.जेएन.४०३५ हस्तगत करण्यात आली आहे. याप्रकरणी भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५, मु.पो. अॅक्ट कलम ३७ (१) (३) चे उलंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक शशिकांत पारधी हे करीत आहेत.