नाशिक येथे वैश्य वाणी समाज महिला मंडळाची स्थापना; समाज प्रगतीसाठी महिलांचा पुढाकार

नाशिक येथे वैश्य वाणी समाज महिला मंडळाची स्थापना; समाज प्रगतीसाठी महिलांचा पुढाकार
नाशिक प्रतिनिधी ;– आजचे युग हे आतिश गतिमान आहे. वेळ कोणासाठी थांबत नाही. प्रत्येक क्षेत्रात जसे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक क्षेत्रात महिलांनी गौरवास्पद कामकाज केले आहे.
संस्थाची प्रगती करावयाची असेल तर महिलांचा प्रतिसाद, सहभाग असणे गरजेचे आहे. त्यानुसार नाशिक जिल्हा वैश्य वाणी समाज बहुउद्देशीय संस्था नाशिक यांचे अध्यक्ष व कार्यकारी मंडळ सदस्य यांनी समाजाभिमुख कामकाज करीत असलेले व समाज प्रगती, साठीचे प्रयत्न, इच्छा, असणाऱ्या महिलांचा समावेश करून महिला मंडळ स्थापना केली.
महिला मंडळाचे पदाधिकारी:नवनियुक्त महिला मंडळाची कार्यकारिणी खालीलप्रमाणे आहे:अध्यक्षा: सौ. शोभाताई भास्कर दवंडे,उपाध्यक्ष: सौ. लताताई केशव वाणी आणि सौ. वंदना मधुकर मुठे ,सचिव: सौ. निलीमा सुरेश वाणी,सहसचिव: सौ. पल्लवी तुषार सुर्यवंशी ,खजिनदार: सौ. शिलाताई भगवान सूर्यवंशी , सहखजिनदार: सौ. मनिषा सुनील आहेर,कार्यकारी सदस्य:सौ. ज्योती मुकुंद गाडेकर,सौ. हेमलता गजानन दलाल , सौ. नंदा प्रमोद थोरात सौ. मनिषा विजय वाणी, सौ. भागश्री रामचंद्र थोरात , सौ. सुनीता जगदीश वाणी , सौ. हेमलता राजेश आहेर , सौ. सुनंदा शरद जाधव , सौ. पल्लवी प्रशांत तिडके , सौ. स्वाती ज्ञानेश्वर शेटे,सौ. सई सचिन शेटे,सौ. पुष्पा जयवंत दवंडे, सौ. वृषाली मच्छिंद्र जाधव , सौ. वैष्णवी राजेंद्र वाघ
या नूतन मंडळाच्या स्थापनेमुळे समाजाच्या प्रगतीला अधिक गती मिळेल, असा विश्वास नाशिक जिल्हा वैश्य वाणी समाज बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष आणि सचिवांनी व्यक्त केला आहे.






