नाथपंथी समाज महासंघाच्या उत्तर महाराष्ट्र महिला अध्यक्षपदी शोभा शिंदे

नाथपंथी समाज महासंघाच्या उत्तर महाराष्ट्र महिला अध्यक्षपदी शोभा शिंदे
अमळनेर I प्रतिनिधी नाथपंथी समाज महासंघाच्या उत्तर महाराष्ट्र महिला अध्यक्षपदी अमळनेर येथिल सौ. शोभा शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.
गुरु गोरक्षनाथ आर्थिक विकास महामंडळ नाथपंथी समाजाला मिळवून दिल्या बददल नवी मुंबई येथे अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघाच्या वतीने वनमंत्री गणेश नाईक आभार सोहळा आयोजित यांचा कृतज्ञता व राष्ट्रीय अध्यक्ष मा. डॉ. जया नाथ व राज्य समितीचे आभार मानले तसेच उत्तर महाराष्ट्र महिला अध्यक्ष म्हणून अमळनेर येथिल सौ. शोभा शिंदे यांची निवड करण्यात आली .
त्या वेळेस महासंघाचे सचिव योगेश बर्वे, अनिल कानडे बालकनाथ वरपे यांचे हस्ते नियुक्ती पत्र देण्यास आले. बाळकृष्ण जाधव ,कलावती वरपे, ज्ञानेश्वर लाइ यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.






