Crime
मोठी बातमी : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी घडविला मोठा स्फोट , ९ जवान शहीद

बिजापूर वृत्तसंस्था :-नक्षलवाद्यांनी आज दुपारी सुरक्षा दलाचे वाहन मोठ्या स्फोटाने उडवून दिल्याची घटना छत्तीसगड मधील बिजापूरमध्ये घडली असूनया स्फोटात भारतीय लष्कराचे ८ जवानांसह चालक शहीद झाला आहे. ६ हून अधिक जवान गंभीर जखमी झाले आहेत, अशी माहिती बस्तरच्या पोलिस अधिक्षकांनी दिल्याचे वृत्त ‘ANI’ने दिले आहे.
सोमवारी (दि.६) दंतेवाडा, नारायणपूर आणि विजापूरचे संयुक्त ऑपरेशन पूर्ण करून परतत असताना विजापूर जिल्ह्यातील कुत्रु-बेद्रे रस्त्यावर नक्षलवाद्यांनी हा घातपात केला. नक्षलवाद्यांनी कुत्रू पोलीस स्टेशन हद्दीतील आंबेली गावाजवळ दुपारी २ वाजून १५ मिनिटांनी आयईडीचा स्फोट करून सुरक्षा दलाचे वाहन उडवले. यामध्ये ८ दंतेवाडा डीआरजी जवान आणि एक ड्रायव्हर यांचा मृतांमध्ये समावेश आहे.