मंगलादेवी चौकातील जीवघेण्या विद्युत तारांचा बंदोबस्त करा.
शॉकसर्किट होणाऱ्या विद्युत तारासंदर्भात निवेदन

अमळनेर |पंकज शेटे | – मंगलादेवी चौकात असलेले विद्युत तार हे एकमेकांना संलग्न असून त्यामुळे बऱ्याच वेळा अचानक आगीच्या ठिणग्या पडताना डोळ्यांना दिसतात. सदर विद्युत तार हे चौकाच्या मधोमध असल्यामुळे तेथे राहत असलेल्या रहिवासी,लहान मुले,वृद्ध यांच्या जीवाला सुद्धा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तरीही कोणतीही जीवित हानी झाल्यास त्याला महावितरण कंपनी जबाबदार राहील..
मंगलादेवी चौक परिसरातील लोकांनी वेळोवेळी तोंडी पाठपुरावा केला आहे तरीही विद्युत मंडळ कडून कोणतीही दुरुस्त अथवा योग्य कारवाई करण्यात आली नाही म्हणून मंगलादेवी चौक मित्र मंडळ तसेच स्थानिक रहिवाशी यांनी आज लेखी निवेदन महावितरण अधिकाऱ्यांना सुपूर्द केले असून येत्या गणेश उत्सवाच्या आधी योग्य तो निर्णय घेऊन विद्युत तार दुरुस्ती करून द्यावे अन्यथा परिसरातील संपूर्ण नागरिक महावितरण समोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदन देते वेळी मंगलादेवी मित्र मंडळाचे तुळशीराम हटकर, हर्षल सैंदाणे, योगेश बारी, शुभम येवले, भूषण बारी, लक्ष्मण हटकर, फकिरा महाजन, बापू कोळी, भूषण बडगुजर, दीप मराठे, जयेश ठाकरे, अक्षय पोरवाल, हर्षल माहेश्वरी आदी उपस्थिती होते.