विद्यार्थिनींसाठी सुवर्णसंधी ; विज्ञान शाखेत ‘डॉ. दिनेश सिताराम पाटील सुवर्णपदक’ जाहीर

विद्यार्थिनींसाठी सुवर्णसंधी ; विज्ञान शाखेत ‘डॉ. दिनेश सिताराम पाटील सुवर्णपदक’ जाहीर
जळगाव– कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विज्ञान शाखेतील तृतीय वर्षात सर्व विषयात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थिनींना यापुढे ‘डॉ. दिनेश सिताराम पाटील सुवर्णपदक’ प्रदान करण्यात येणार आहे.
गोजेरे (ता. भुसावळ) येथील सुनील सीताराम पाटील यांनी या सुवर्णपदकासाठी देणगी दिली असून शिक्षण क्षेत्रातील ही प्रेरणादायी देणगी गुणवंत विद्यार्थिनींसाठी नवी दिशा ठरणार आहे. या सुवर्णपदकामुळे विज्ञान शाखेतील विद्यार्थिनींमध्ये अभ्यासाची प्रेरणा निर्माण होऊन स्पर्धात्मक वातावरणात अधिक प्रोत्साहन मिळेल, असे प्रतिपादन कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी व्यक्त केले.
यावेळी माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, प्रा. योगेश पाटील व सी. ए. रवींद्र पाटील उपस्थित होते.






