
विद्यापीठाचे सहायक कुलसचिव भाऊराव सोनवणे यांचा सेवानिवृत्तनिमित्त सत्कार
जळगाव (प्रतिनिधी) :- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील सहायक कुलसचिव भाऊराव सोनवणे हे आज विद्यापीठ सेवेतून निवृत्त झाले. विद्यापीठाच्या रसायन तंत्रज्ञान संस्था (युआयसीटी) येथील सहायक कुलसचिव भाऊराव सोनवणे हे नियत वयोमानानूसार विद्यापीठाच्या सेवेतून सेवा निवृत्त झाले आहेत.
सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी यांना कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा.एस.टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत निरोप देण्यात आला. सत्कारार्थी यावेळी सहकुटूंब उपस्थित होते. यावेळी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी संघटना, मागासवर्गीय कर्मचारी संघटना व उमवि पतपेढीच्या वतीने सेवानिवृत्त होत असलेल्या अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.






