Special

लक्ष द्या.. इथे सुरू आहे ऑनलाईन लॉटरी, जळगाव पोलीस कारवाई करणार?

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरात सुरू असलेल्या ऑनलाईन लॉटरीला अनेक जण बळी पडत असून तरुणांच्या माथी कर्जाचा डोंगर वाढत आहे. ऑनलाईन लॉटरीचा फंडा, जळगावकरांना कसा गंडा घालतोय हे महा पोलीस न्यूजने समोर आणले होते. तद्नंतर दोन दिवस अड्डे बंद होते मात्र पुन्हा लॉटरी सुरू झाली आहे. महा पोलीस न्यूजच्या माध्यमातून आम्ही आज ऑनलाईन लॉटरीचे अड्डे समोर आणले जाणार आहेत.

जळगाव शहरात सुरू असलेल्या ‘दस का दम’मध्ये एक २० रुपयांच्या डावला १०० रुपये मिळतात तर फन टार्गेटमध्ये एका गेमला ९ ते ३६ रुपये मिळतात. शहरात अनेक ठिकाणी हा गेम सुरू आहे. ऑनलाईन पद्धतीने खेळला जाणाऱ्या या गेमचा निकाल अवघ्या १ मिनिटात येत असतो आणि दिवसभर हा खेळ सुरू असतो. ‘दस का दम’ गेम मनोरंजनात्मक खेळाच्या नावाखाली दाखवण्यात येतो मात्र त्याचे सर्व काम केवळ १ ऑनलाईन आयडीवर सुरू असते. एक ऑनलाईन आयडी तयार केल्यानंतर त्याद्वारे सर्व खेळ खेळले जातात.

शहरात अनेक ठिकाणी खेळली जाते ऑनलाईन लॉटरी
जळगाव जिल्ह्यात लॉटरीसाठी आयडी देणारा मुख्य म्होरक्या कोण हे अद्याप समोर आलेले नसले तरी बिनधास्तपणे हा खेळ सुरू असल्याचे महा पोलीस न्यूजने समोर आणले होते. माहितीनुसार जळगाव शहरात एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत शेरा चौक, सिंधी कॉलनी (सट्टा पेढी बाजूला), जुनी इच्छादेवी चौकी शेजारी, जळगाव शहर पोलीस ठाणे हद्दीत जुने बस स्थानक बाजूच्या गल्ली, बळीराम पेठ १७ नंबर शाळेच्या बाजूला, रामानंद नगर पोलीस ठाणे हद्दीत सोमाणी मार्केट, पिंप्राळा हुडको परिसरात ‘दस का दम’ आणि ऑनलाईन लॉटरी खेळली जाते.

जळगाव पोलीस कारवाई करणार?
माहितीनुसार सध्या कोणताही आकडा स्थानिक पातळीवर तयार केलेल्या बनावट सॉफ्टवेअरच्या माध्यमातून काढण्यात येत आहे. लोकल सॉफ्टवेअर असल्याने कमी रक्कम लावलेल्या जुगाराचा आकडा लागतो तर मोठ्यांना चुना लागत असतो. महा पोलीस न्यूजने या प्रकरणी वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर २ दिवस सर्व बंद होते मात्र मंगळवारी पुन्हा ते अड्डे सुरू करण्यात आले आहेत. जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी कारवाई करण्याच्या सूचना केल्या असून प्रत्यक्षात कारवाई होते की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button