कळंत्री विद्यालय- स्वामी विवेकानंद चित्र प्रदर्शन संपन्न.

चाळीसगाव (भूषण शेटे ) : एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमती चंपाबाई रामरतन कळंत्री प्राथमिक विद्यालयात स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित चित्र प्रदर्शन भरविण्यात आले. रामकृष्ण विवेकानंद सेवा संस्था, घाट रोड, चाळीसगांव यांच्यामार्फत या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष आर.सी. पाटील सर उपाध्यक्ष मिलिंद दादा देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी रामकृष्ण मिशनचे श्री हेमंत साळी, श्री रमेश जानराव सर, श्री प्रदीप ठाकूर, मुख्याध्यापक प्रमोद दायमा सर्व शिक्षक-वृंद उपस्थित करण्यात आले. शाळेचे चेअरमन श्री भोजराजजी पुंशी यांनी प्रदर्शनाला भेट देत कौतुक केले. याप्रसंगी सर्व मान्यवरांचे गुलाबपुष्प व तेजोमय अंक देऊन स्वागत करण्यात आले. जानराव सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्वामी विवेकानंद यांच्या कार्याविषयी माहिती देत विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन मोठे व्हावे असे सांगितले. तसेच रामकृष्ण विवेकानंद सेवा संस्थेमार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व उपक्रमांची माहिती सांगितली. अध्यक्षीय भाषणात श्री आर.सी. पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना पुस्तकाचे वाचन करून समृद्ध व्हावे व संस्कारशील नागरिक शाळेतून घडावे यासाठी शाळेत असे प्रदर्शन व कार्यक्रम घेण्याचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण बाग यांनी केले. प्रदर्शनाची नियोजन श्री योगेश कोठावदे यांनी केले. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना प्रदर्शन दाखवून माहिती दिली व सहकार्य केले.






