Crime

पिंपळगाव बसवंत परिसरात २३ किलो ६१० ग्रॅम वजनाचा गांजा हस्तगत

पिंपळगाव बसवंत परिसरात २३ किलो ६१० ग्रॅम वजनाचा गांजा हस्तगत

पिंपळगाव बसवंत | प्रतिनिधी

नाशिक ग्रामीण पोलिसांनी पुन्हा एकदा अंमली पदार्थांच्या अवैध व्यवहारावर  कारवाई करत मोठ्या प्रमाणात गांजाचा साठा जप्त केला आहे. पिंपळगाव बसवंत परिसरातील उंबरखेड रोड येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून तब्बल २३ किलो ६१० ग्रॅम वजनाचा गांजा हस्तगत केला असून, ४ लाख ७२ हजार २०० रुपये किंमतीचा हा साठा होता.

ही कारवाई २५ जून २०२५ रोजी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार व अपर पोलीस अधीक्षक श्री. आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मगर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने उंबरखेड रोड परिसरात छापा टाकला. यावेळी अनिकेत संदीप औरणार (वय २२), रा. उंबरखेड रोड, भावनगर, पिंपळगाव बसवंत या तरुणाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात गांजाची विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती.

सदर आरोपी विनापरवाना बेकायदेशीररीत्या गांजासारखा अंमली पदार्थ विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले असून, त्याच्याविरुद्ध एन.डी.पी.एस. कायदा कलम ८(क), २०(ब), ॥(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही धडक कारवाई पोलीस निरीक्षक रविंद्र मगर, पोउनि प्रकाश भालेराव, पो. अं. नवनाथ वाघमोडे, संदिप नागपुरे, सतीश जगताप, किशोर खराटे, सतीश घुटे, विश्वनाथ धारबळे, योगिता काकड, किशोर बोडके, बालाजी कुंटेवाड, संतोष पाटील, तानाजी झुरडे यांच्या पथकाने केली.

ही कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या अंमली पदार्थ विरोधी मोहिमेतील एक मोठी कामगिरी ठरली आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button