जळगाव येथील पोलीस कवायत मैदानावर 35 व्या जळगाव जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा दोन डिसेंबर ते चार डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धांचा समारोप आणि बक्षीस वितरण समारंभ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही.एल. माहेश्वरी यांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी हे बक्षीस वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर उपस्थित होत्या. या क्रीडा स्पर्धेत पोलीस मुख्यालय जळगाव, भुसावळ चाळीसगाव मुक्ताईनगर पाचोरा चोपडा अमळनेर या विभागातील पुरुष व महिला अशा एकूण 125 खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धा अतिशय अतितटीच्या झाल्या असुन या वर्षी वैय्यक्तीक खेळामध्ये धावणे,उंच उडी, कुस्ती, गोळा फेक, वेल लिफ्टिंग, भाला फेक, ज्युडो, स्विमिंग, बॉक्सिंग ईत्यादी वैयक्तीक व हॉकी, फुटबॉल, कबड्डी, व्हॉलीबॉल सारख्या सांधिक क्रिडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.
या सर्व स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील खेळाडुंनी अतिशय उत्साहाने भाग घेतल्यामुळे या स्पर्धा अत्यंत चुरशिच्या झाल्या.
बक्षीस समारंभात 100 मीटर पुरुष स्पर्धेत पोलीस कॉन्स्टेबल समीर पठाण व 100 मीटर महिला स्पर्धेत महिला पोलीस कॉन्स्टेबल अश्विनी कोंडके यांना बेस्ट प्लेयर चे बक्षीस देण्यात आले जिल्ह्यातील विजयी संघ व खेळाडु आगामी परिक्षेत्रीय क्रिडास्पर्धे मध्ये सहभागी होतील.सदर क्रिडा स्पर्धा यशस्विरित्या पार पाडण्यासाठी शहरातील विविध क्रिडा संस्थांचे प्रतिनीधी, पंच, क्रिडापटु, या सर्वांचे सहकार्य लाभले.