Other
भडगाव पोलीस ठाण्याला नवीन पोलीस निरीक्षक महेश शर्मा रुजू

महा पोलीस न्यूज । सागर महाजन । भडगाव पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. यापूर्वी पोलीस निरीक्षक असलेले पांडुरंग पवार यांची पदोन्नतीने जळगाव येथे पोलीस उपअधीक्षकपदी बदली झाली आहे. त्यांच्या जागी महेश शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जळगाव येथील जिल्हा विशेष नियंत्रण कक्षातून त्यांची भडगावला बदली झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील रहिवासी असलेले महेश शर्मा यांना २९ वर्षांचा प्रदीर्घ पोलीस सेवेचा अनुभव आहे. पोलीस उपनिरीक्षकापासून त्यांनी मुंबई, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी आणि जळगाव अशा विविध ठिकाणी सेवा बजावली आहे.
नवीन पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांचे भडगाव शहर आणि तालुक्यातील नागरिकांनी स्वागत केले असून, पत्रकार संघानेही शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.