मोठी बातमी : १४ पोलीस अधिकाऱ्यांची पदस्थापना, दोघांची बदली, वाचा कोण, कुठे?
महा पोलीस न्यूज | ७ मार्च २०२४ | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील काही पोलिस अधिकाऱ्यांच्या परिक्षेत्रांतर्गत बदल्या करण्यात आल्या होत्या. दरम्यान, इतर जिल्ह्यातून जळगाव जिल्ह्यात काही पोलीस अधिकारी असल्याने त्यांची देखील पदस्थापना राहिलेली होती. जिल्ह्यासह बाहेरील जिल्ह्यातून आलेले पाच पोलीस निरीक्षक, दोन सहायक पोलीस निरीक्षक व सात पोलीस उपनिरीक्षकांना पदस्थापना देण्यात आली. तसेच दोन पोलीस निरीक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहे.
पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी काढलेल्या आदेशानुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी डॉ. विशाल जयस्वाल यांना रावेर, यावल पोलिस ठाण्याचे राकेश मानगावकर यांना जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. यासोबतच अमरावती ग्रामीण येथून आलेले प्रदीप ठाकूर यांना यावल पोलिस ठाणे, नाशिक ग्रामीण येथून आलेले राजेंद्र कुटे यांना रामानंदनगर पोलिस ठाणे, अशोक पवार यांना पाचोरा पोलिस ठाणे, पांडुरंग पवार यांना भडगाव पोलिस ठाणे व मुंबई लोहमार्ग येथून आलेले दत्तात्रय निकम यांना सायबर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तसेच आर्थिक गुन्हे शाखेचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. अहमदनगर येथून आलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत खंडारे यांना चोपडा शहर पोलिस ठाणे, महेश येसेकर यांना पारोळा पोलिस ठाणे येथे पदस्थापना देण्यात आली आहे.
नाशिक ग्रामीण येथून आलेले पोलिस उपनिरीक्षक विजय गायकवाड यांना भुसावळ शहर पोलिस ठाणे, बबन पाटोळे यांना फैजपूर पोलिस ठाणे, चंद्रकांत दवंगे यांना जामनेर पोलिस ठाणे, संजय विधाते यांना पहूर पोलिस ठाणे, धुळे येथून आलेले कैलास दामोदर यांना रामानंदनगर पोलिस ठाणे, अहमदनगर येथून आलेले भरत दाते यांना पहूर पोलिस ठाणे, नंदुरबार येथून आलेल्या प्रिया वसावे यांना रावेर पोलिस ठाणे येथे पदस्थापना देण्यात आली आहे.