महामार्ग अडवला, १०० वर आंदोलकांवर गुन्हा दाखल
महा पोलीस न्यूज | २ मार्च २०२४ | जिल्हाधिकारी जळगांव यांचे जमाव बंदीचे आदेश असताना गैर कायद्याची मंडळी जमवून राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर वाहतूक पुर्णपणे अडवल्या प्रकरणी २४ जणांविरूद्ध एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी भा.द.वी. कलम १८८, १४३, ३४१ व म.पो.का.क.३७ (१)(३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे फिर्यादीत नोंद केली आहे.
गुरुवारी एरंडोल येथे अमळनेर नाक्याजवळ चौपदरी हायवे वरील समस्या व त्रुटी दुरुस्त व्हावी या मागणीसाठी ठिय्या आंदोलन कऱण्यात आले होते. आरोपीमध्ये दशरथ महाजन, विजय महाजन, नाना महाजन, अमित पाटील, दुर्गादास महाजन, जगदिश ठाकुर, किशोर निंबाळकर, रमेश महाजन, राजेंद्र चौधरी, राजेंद्र महाजन, किशोर महाजन, डॉ.फरहाज बोहरी, परेश बिर्ला, अतुल महाजन, प्रमोद महाजन, शेख कालू शेख सांडू, गोपाल महाजन, किरण चौधरी, किरण महाजन, गोरख चौधरी, बी. एस.चौधरी, प्रा.शिवाजीराव अहिरराव, कैलास महाजन, पंकज महाजन व इतर १५० ते २०० जणांचा संशयितांमध्ये समावेश आहे. आरोपींनी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक अडवून आंदोलन सुरु ठेवून शासकीय आदेशाचे उल्लंघन केले आहे. असे फिर्यादीत नमूद करण्यात आलेले आहे.