Other
शनिमंदिराचे पुजारी पुरुषोत्तम जोशी यांचे निधन, आज अंत्ययात्रा

महा पोलीस न्यूज । दि.१७ सप्टेंबर २०२४ । जळगाव शहरातील शनिपेठ शनिमंदिराचे पुजारी पुरुषोत्तम चंपालाल जोशी (वय-७३) यांचे सोमवार दि.१६ सप्टेंबर रोजी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. स्व.पुरुषोत्तम जोशी यांची अंत्ययात्रा उद्या दि.१७ रोजी सकाळी १० वाजता शनीमंदिर, शनिपेठ येथून निघणार असून नेरी नाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.