पुण्यात औंध परिसरात दहशत माजवणारे सात सराईत गुन्हेगार अटकेत; पिस्तूल, कोयते आणि वाहने जप्त

पुण्यात औंध परिसरात दहशत माजवणारे सात सराईत गुन्हेगार अटकेत; पिस्तूल, कोयते आणि वाहने जप्त
पुणे : औंध परिसरात दहशत निर्माण करून नागरिकांना भयभीत करणाऱ्या सात सराईत गुन्हेगारांना चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून देशी बनावटीचे पिस्तूल, तीन कोयते, मोटार आणि दुचाकींसह एकूण ७ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत :
प्रतीक सुनील कदम (वय २६), अमीर अल्लाउद्दीन शेख (२८), समीर अल्लाउद्दीन शेख (२६), जय सुनील चेंगट (२१), अभिषेक अरुण आवळे (२४, सर्व रा. कस्तुरबा गांधी वसाहत, औंध), अतुल श्याम चव्हाण (२८, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, औंध) आणि रॉबिन दिनेश साळवे (२६, रा. दर्शन पार्क, औंध).
चतु:शृंगी पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून, या टोळीने यापूर्वीही गुन्हे केले आहेत का, याचा शोध घेतला जात आहे.