Politics

“राष्ट्रीय जनमंच पक्षाची” जळगाव जिल्हा आढावा बैठक चोपडा शहरात संपन्न!

चोपडा : आगामी जिल्हा परिषद आणि पं.समिती तसेच महानगरपालिका व नगरपालिका यासह सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नजरेसमोर ठेऊन *राष्ट्रीय जनमंच पक्षाची* जळगाव जिल्हा आढावा बैठक शासकीय विश्रामगृह, चोपडा येथे दि. 21 ऑगस्ट रोजी संपन्न झाली.

पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव मा.संदिपदादा लांडगे आणि प्रदेश प्रभारी संघटक मा. देविदास वाघ , जळगाव जिल्हा अध्यक्ष देविदास हटकर

हे या बैठकीस मार्गदर्शक म्हणुन उपस्थीत होते.

या जिल्हास्तरीय बैठकीत स्थानिक ज्वलंत प्रश्नांवर आवाज उठविणे, सामान्यांसाठी संघर्ष करणे याबरोबरच आगामी जिल्हा परिषद आणि पं.समिती तसेच महानगरपालिका सह नगरपालिकांच्या होणा-या निवडणुका स्वबळावर लढविण्याच्या दष्टीने जास्तीत जास्त उमेदवार उभे करणे, पक्ष संघटन मजबुत करणे या विषयावर चर्चा झाली. तसेच पक्ष संघटनेचा एक भाग म्हणुन काही पदाधिकारी नियुक्त करण्यात आले.

या बैठकीत गाव -धानोरा, तालुका – चोपडा येथील रहिवासी

*मा.सुरेश सोनवणे* यांची *चोपडा तालुका अध्यक्ष* पदी नियुक्ती

तसेच *मा. लीलाधर कोळी* यांची *चोपडा शहर अध्यक्ष* पदी नियुक्ती करण्यात आली.

महाराष्ट्र प्रदेश संघटक देविदास आर वाघ यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

राष्ट्रीय जनमंच पक्षाचे विचार, पक्षाचे धोरण घराघरात पोहोचवण्यासाठी काम करेन आणि तालुक्यात संघटनात्मक मजबुती वाढवून चोपडा तालुक्यात पक्ष वाढीसाठी मेहनत करेल असे आश्वासन नूतन तालुका अध्यक्ष आणि शहर अध्यक्ष यांनी दिले.

यावेळी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव संदीप लांडगे, प्रदेश प्रभारी संघटक देविदास वाघ, जळगाव जिल्हाध्यक्ष देविदास हटकर , चाळीसगाव तालुका अध्यक्ष सुरेश वेळीस यांनी मार्गदर्शन केले.

पक्षाचे चोपडा तालुका अध्यक्ष सुरेश सोनवणे यांनी आभार मानले.

या प्रसंगी रवींद्र महाजन, भीमराव पाटील, संदीप पाटील, दिनकर चव्हाण, विशाल कोळी, संदीप कोळी, साहिल काळे, अमोल कोळी, पप्पू धनगर, दानिश शेख , सलमान शेख, नईम शेख, फिरोज पिंजारी, शबाना पिंजारी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button