Crime

रावेर वनविभागाची मोठी कारवाई : 5.73 लाखांचा अवैध लाकूडसाठा जप्त

रावेर वनविभागाची मोठी कारवाई : 5.73 लाखांचा अवैध लाकूडसाठा जप्त

मध्य प्रदेश वनविभागाकडे सुपूर्द

जळगाव : रावेर वनपरिक्षेत्राच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे रावेर-चोरवड मार्गावरील लोणी गावाजवळ 5 मे 2025 रोजी मोठी कारवाई केली. यावेळी 5.73 लाख रुपये किंमतीचा अवैध लाकूडसाठा जप्त करण्यात आला. हा साठा मध्य प्रदेशातून बेकायदा आणला गेल्याचे उघड झाल्याने, पुढील कारवाईसाठी तो मध्य प्रदेश वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आला.

गस्ती दरम्यान, रावेर वनपरिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांनी MH04CU5418 क्रमांकाचा आयशर ट्रक आणि MH19Z7862 क्रमांकाचा ट्रॅक्टर अडवला. तपासणीत दोन्ही वाहनांमध्ये परवानगीशिवाय 31 घनमीटर पंचरास जातीचे लाकूड आढळले. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 5,73,400 रुपये आहे.

मध्य प्रदेश वनविभागाचा ताबा
सदर गुन्हा मध्य प्रदेशच्या हद्दीत घडल्याचे स्पष्ट झाल्याने, रावेर वनविभागाने मध्य प्रदेश वनविभागाशी संपर्क साधला. त्यानुसार, वनपाल युनुस दाऊदी, वनरक्षक आर. डी. काजळे आणि वीरेंद्र कुमार यांनी घटनास्थळी पोहोचून लाकूडसाठा आणि वाहने ताब्यात घेतली.वरिष्ठांचे मार्गदर्शन
ही कारवाई वनसंरक्षक नीनू सोमराज (प्रादेशिक, धुळे), उपवनसंरक्षक जमीर शेख (यावल), विभागीय वन अधिकारी आर. आर. सदगीर (दक्षता, धुळे) आणि सहायक वनसंरक्षक समाधान पाटील (यावल) यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.

या मोहिमेत वनपाल अरविंद धोबी (सहस्त्रलिंग), वनरक्षक आयेशा पिंजारी (अहिरवाडी), सविता वाघ (पाडळे खुर्द), जगदीश जगदाळे (जुनोना), वनमजूर सुभाष माळी आणि वाहनचालक विनोद पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button