सागवानी पलंग आणि सोफासेटची वाहतूक करणारे वाहन पकडले
दोन लाखांचा मुद्देमाल जप्त ; रावेर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची कारवाई

महा पोलीस न्यूज । दि.२७ जानेवारी २०२५ । येथील रावेर सावदा रस्त्यावर अवैधरीत्या सागवानी पलंग आणि सोफासेट याची वाहतूक करणारे वाहन मौजे सावदा गावाजवळ वन विभागाच्या गस्त घालणाऱ्या पथकाला २६ जानेवारी रोजी रात्री पाऊण वाजेच्या सुमारास आढळून आल्याने वनविभागाच्या पथकाने तपासणी केली असता यामध्ये चार सागवानी पलंग आणि एक सोपासेट आढळून आला. याबाबत व वाहनधारकाकडे कुठलाही परवाना आढळून न आल्याने 64,500 चे सागवानी साहित्य आणि मालवाहतूक करणारी एक लाख 26 हजार रुपये किमतीची वाहन जप्त करण्यात आले आहे.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार 26 जानेवारी रोजी रात्री पाऊण वाजेच्या सुमारास रावेर सावदा रस्त्यावर वनपरिक्षेत्र अधिकारी यांना मिळालेल्या माहितीनुसार मौजे सावदा गावाजवळ टाटा कंपनीचा एम एच 04 एफ जे 3248 क्रमांकाच्या वाहनाला थांबवले असता यात सागवान चे चार पलंग आणि एक सोफा सेट आढळून आला. याबाबत वाहनचालक गणेश भिमराव खैरनार वय 27 रा. जळगाव याला परवाना बाबत विचारले असता त्याने कुठलाही परवाना नसल्याचे सांगितले. या सागवानी साहित्याची 64,500 इतकी किंमत असून मालवाहतूक करणारे वाहनाची किंमत एक लाख 26 हजार रुपये असा एकूण एक लाख 90 हजार पाचशे रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई धुळे वन संरक्षक निनू सोमराज, यावल वनविभाग उपवनसंरक्षक जमीर शेख, विभागीय वनाधिकारी आर आर सदगीर, चोपडा सहायक वन संरक्षक प्रथमेश हडपे, सहाय्यक वनसंरक्षक यावल वन विभाग समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी राहावे अजय बावणे, रवींद्र सोनवणे, सुपडू सपकाळे, जगदीश जगदाळे आदींच्या पथकाने केली.