चोरीच्या २ दुचाकींसह चोरटा रावेर पोलिसांच्या जाळ्यात
महा पोलीस न्यूज | १० मार्च २०२४ | रावेर तालुक्यात दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीच्या दोन दुचाकी हस्तगत केल्या असून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
रावेर पोलीस ठाणे हद्दीत पोलीस गस्तीवर असताना सायला मानसिंग बारेला वय-१८ वर्ष रा.खा-या काकोडा, ता.झिरण्या, जि.खरगोन मध्यप्रदेश, ह.मु.गिटटी खदान, उटखेडा रोड, ता.रावेर याने चोरीची दुचाकी आणली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांना मिळाली. पथकाने सापळा रचत त्यास थांबवून चौकशी केली असता त्याने त्याच्या ताब्यातील दुचाकीचे कागदपत्रे सादर न करता त्याबाबत उडवा उडवीचे उत्तर दिले.
पोलिसांनी अधिक चौकशी केली असता ती दुचाकी त्याने रावेर येथून आठवडे बाजार पटयातील नगर पालिकेच्या सार्वजनिक शौचालयाचे अलीकडील गल्लीतून चोरुन आणल्याची कबुली दिली. पोलिसांनी आणखी चौकशी आणि तपास केला असता रावेर पोलीस ठाणे हद्दीतील आणखी एक चोरीची दुचाकी काढून दिली आहे.
संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग, पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार ईश्वर चव्हाण, पोलीस नाईक किशोर सपकाळे, सचिन घुगे, प्रमोद पाटील, विशाल, महेश मोगरे, अमोल जाधव, विकार शेख, तथागत सपकाळे,
यांच्या पथकाने केली आहे.