जळगाव एसीबी कार्यालयात फेरबदल, उप अधीक्षकपदी योगेश ठाकूर
महा पोलीस न्यूज । दि.२८ ऑगस्ट २०२४ । राज्यातील गृह विभागात बदली प्रक्रिया सुरु असून जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागात देखील फेरबदल झाले आहेत. जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागात उपअधीक्षक म्हणून योगेश ठाकूर यांची तर पोलीस निरीक्षक म्हणून स्मिता नवघरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगांव घटकाचे पोलीस उप अधीक्षक सुहास देशमुख यांची ला.प्र.वि.जळगांव ते ला.प्र.वि., मुख्यालय अशी अंतर्गत बदली झाली आहे. तसेच त्यांच्या जागी पोलीस उप अधीक्षक योगेश गंगाधर ठाकुर यांची ला.प्र.वि., मुख्यालय ते ला.प्र.वि. जळगांव अशी बदली झाल्याने त्यांनी दि.२७ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगांव युनिटचा कार्यभार स्विकारला आहे.
तसेच ला.प्र.वि.जळगांव येथे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे यांची ला.प्र.वि. जळगांव ते ला.प्र.वि.नाशिक अशी अंतर्गत बदली झाली असून त्यांचे जागी पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे यांची राज्य गुप्तवार्ता विभाग ते ला.प्र.वि.जळगांव येथे बदली झाली असुन त्या देखील कर्तव्यावर हजर झालेल्या आहेत.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगांव युनिटतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही कार्यालयामध्ये कोणी शासकीय अधिकारी/कर्मचारी किंवा त्यांचे वतीने कोणी खाजगी इसम लाचेची मागणी करीत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगांव कार्यालयाशी संपर्क साधुन निर्भिडपणे या कार्यालयाकडे तक्रार नोंदवावी.
कार्यालयीन वेळेनंतर वा सुटीचे दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यप्रणालीबाबत व तक्रारीबाबत माहीती पाहीजे असल्यास पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकुर यांच्या मोबाईल क्रमांक ९७०२४३३१३१ किंवा दूरध्वनी क्रमांक ०२५७-२२३५४७७ यावर संपर्क साधावा. महाराष्ट्रातील सर्व जनतेच्या सोईच्या दृष्टीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यासाठी लॅन्डलाईन ते लॅन्डलाईन व मोबाईल ते लॅन्डलाईन अशी टोल फ्री नंबर १०६४ ची सेवा सुरु करण्यात आली असून या क्रमांकावर लाचलुचपत प्रतिबंधक कार्यप्रणाली संबंधी व करावयाच्या तक्रारी संबंधी नागरीकांनी मार्गदर्शन करण्यात येते.