Crime
अज्ञात वाहनाच्या धडकेत अनोळखी तरुण ठार
जळगाव : रस्त्याने पायी चालणाऱ्या अंदाजे 35 वर्षे वयाच्या तरुणाला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत त्याचा मृत्यू झाल्याची घटना एक डिसेंबर रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास साकेगाव जवळ असणाऱ्या पेट्रोल पंपाचा नजीक घडली. ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील एका पेट्रोलपंपासमोर राष्ट्रीय महामार्गावर रविवार दि. १ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता एक तरुण पायी जात होता. त्या वेळी त्याला भरधाव अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. त्याला खासगी वाहनाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. मयताची ओळख पटविण्याचे आवाहन जिल्हा पेठ पोलिसांनी केले आहे.