जिल्हा परिषदेच्या 24 कर्मचाऱ्यांच्या पदोन्नत्या

जळगावः जि.पच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, सहाय्यक प्रशासन अधिकारी संवर्गातील २४ कर्मचाऱ्यांना आज दि.३० रोजी पदोन्नत्या देण्यात आल्या. यात कनिष्ठ सहाय्यक पदावरून वरिष्ठ सहाय्यक पदावर, वरिष्ठ सहाय्यकांना कनिष्ठ प्रशासन अधिकारी पदावर व कनिष्ठ प्रशासन अधिकाऱ्यांना सहाय्यक प्रशासन अधिकारी पदावर पदोन्नत्या देण्यात आल्या.
सायंकाळी पदोन्नती पात्र कर्मचाऱ्यांकडून सामान्य प्रशासनाने प्रत्येकी पाच विकल्प भरून घेतले. त्यानंतर रिक्त असलेल्या ठिकाणी या कर्मचाऱ्यांना पदोन्नत्या देण्यात आल्या. सायंकाळी उशिरा सीईओ श्री. अंकित यांनी आदेश जारी केले असुन .३१ रोजी संबधीत कर्मचाऱ्यांना पदोन्नतीच्या ठिकाणाचे आदेश दिले जाणार आहे. गेल्या अनेक महिन्यापासून विधानसभा व लोकसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे ही प्रक्रीया थांबली होती.