Crime

तलवारीसह सचिन टिचकुल एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात

महा पोलीस न्यूज | ८ मार्च २०२४ | जळगाव जिल्ह्यातून हद्दपार असलेला आरोपी तुकाराम वाडी परिसरात लोखंडी तलवार हातात घेऊन दहशत माजवत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी रात्री ११ वाजेच्या सुमारास त्याला ताब्यात घेत तलवार जप्त केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव जिल्ह्यातून २ वर्षाकरीता हद्दपार करण्यात आलेला आरोपी सचीन उर्फ टिचकुल कैलास चौधरी रा.तुकामरावाडी हा तुकारामवाडी परीसरात हातात लोखंडी तलवार घेवुन दहशत माजवित आहे असल्याची माहीती एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. पथकाने रात्री ११ वाजता त्याला हनुमान मंदीर परीसर येथुन ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून एक लोखंडी तलवार जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी त्याच्याविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हद्दपार आरोपीवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात ५ गुन्हे व जिल्हापेठ पोलीस ठाण्यात २ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, हवालदार रामकृष्ण पाटील,गणेश शिरसाळे, पोलीस नाईक योगेश बारी, नाना तायडे, किरण पाटील, ललील नारखेडे अशांनी यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button