महमूद शेख मुसा यांना समाजरत्न पुरस्कार
महा पोलीस न्यूज । दि.२८ ऑगस्ट २०२४ । जळगाव येथील हजरत बिलाल संस्थेतर्फे नुकतेच शहरात पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमात विविध सामाजिक कार्यक्रमात सक्रिय राहणारे शाहू नगरातील रहिवासी व आयडियल सामाजीक संस्थेचे अध्यक्ष महमूद शेख मुसा यांना समाजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
अल्पबचत भवनात पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.पराग कोचुरे, प्रमुख पाहुणे आरिफ भाई, ऍड.शरीफ शेख उपस्थित होते. कार्यक्रमात संस्था अध्यक्ष सय्यद अकील पैलवान यांनी संस्थाचे उद्देश व कार्य याविषयी थोडक्यात थोडक्यात माहिती दिली. प्रसंगी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे नागरिकांना स्मृती चिन्ह देऊन गौरविण्यात करण्यात आले. त्यात शाहू नगरातील रहिवासी व आयडियल सामाजीक संस्थेचे अध्यक्ष महमूद शेख मुसा यांना समाज रत्न पुरस्कार देण्यात आला.
महमूद शेख यांनी सामाजिक व शिक्षणक्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. महेमूद शेख गेल्या २५ वर्षापासून समाजसेवक म्हणून त्यांची कामगिरी बजावत आहे.